IDBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी…
ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे आणि जे अशा नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत उमेदवारांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या ५०० जागांसाठी भरती होणार आहे. या पदासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी असेल. इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.
परीक्षा १७ मार्च रोजी घेतली जाईल. प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ५०० जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षे यादरम्यान असावे.
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये असेल. तर, इतर वर्गांतील उमेदवारांसाठी एक हजार रुपये अर्ज शुल्क असेल.
http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.