Skip to content
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
डासांपासून सुरक्षित ठेवा घरआपल्या घरातील स्वच्छता पाळावी. स्वयंपाकघरात पाणी साठू देऊ नये ही सर्वात पहिली पायरी आहे. डेंग्यूचे डास पसरणार नाही याची काळजी घरापासूनच घ्यायला सुरूवात करा. जमलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास लवकर येतात आणि त्यामुळे वेळोवेळी पाणी स्वच्छ करा आणि कुठेही घरात पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या.