अखेर,केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली होती. तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले.परंतु त्यात यश आले नाही.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सादर केला असून पंतप्रधानांनीही तो मान्या केल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे राजीनामा सादर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एक पत्रही शेअर केलं आहे.
नीट-यूजी २०२६ परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका गळती आणि परीक्षा व्यवस्थापनावरील वादाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या प्रकरणामुळे सरकारवर वाढता दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संदेशात धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. सरकारकडून परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

