अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या घोषणा केल्या, जाणून घ्या
या अर्थसंकल्पात एकूणच सर्वसामान्य माणसाला काय मिळेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना यंदाच्या बजेट मध्ये शेतकरी , महिला , ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याकडे दिसत आहे.
अर्थसंकल्पात केलेल्या महत्त्वाच्या घोषणा…
पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार.
6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्ट्रीवर नोंदवली जाणार.
पूर्वेकडी राज्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा उघडणार.
ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद.
आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य.
पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या 30 लाख युवकांचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार.
भाजीपाला उत्पादन आणि वितरणासाठी आणखी एफपीओ स्थापन करण्यात येणार.
पंतप्रधान इंटर्नशीप योजनेनुसार 5 हजार रुपये मासिक भत्ता मिळणार आहे.
आसाममधील पूर नियंत्रणासाठी केंद्र आर्थिक मदत करणार आहे.
बिहारच्या कोसीसाठीही योजना राबवणार आहे.
सरकार ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय घेणार आहे.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1.8 कोटी लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
पीएम आवास योजना- शहरी 2.0साठी एक कोटी कुटुंबाला घरे देण्यात येणार आहे. त्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
सरकार शहरी घरांसाठी स्वस्तात कर्ज देण्यासाठी व्याज सबसिडी योजना आणण्यात येणार आहे.
राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
टॅक्स प्रकरणे सहा महिन्यात सोडवणार
इन्कम टॅक्स अॅक्ट 1961ची सहा महिन्यात समीक्षा केली जाणार
स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द
परदेशी कंपन्यांवरील कार्पोरेट टॅक्स दर 40 टक्क्यांवरून 35 टक्के करणार
बिहारमध्ये हायवेसाठी 26 हजार कोटींची तरतूद
महिलांच्या रोजगार निर्मिती साठी विशेष भर देणार
कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
शेतकऱ्यांना साठी डिजिटल प्लॅटफॉर्म
नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न
भाजीपाला वाहतुकीसाठी विशेष साखळी तयार करणार
महिलांच्या रोजगार निर्मिती साठी विशेष भर देणार
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न
सहकार क्षेत्राचा विकास करून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणार
रोजगार निर्मिती साठी 2 लाख कोटी खर्च करणार
गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 वर्ष वाढवली
शैक्षणिक कर्जासाठी 3 टक्के व्याजाची सूट मिळणार
नव्या व्यवसायासाठी युवकांना कर्ज देणारदेशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत सरकार मदत करणार
पीएम विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवणार
टॅक्स स्लॅब मधील बदल…
0-3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल
3 ते 7 लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
7 ते10 लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर
10 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर 15 टक्के कर
12 ते 15 लाखाच्या उत्पन्नार 20 टक्के कर
15 लाखाहून अधिकच्या उत्पन्नावर 30 टक्के कर
जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही