अपडेटराष्ट्रीय

८० कोटी नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार – केंद्र सरकार

Share this post

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गरिबांना मोफत रेशन देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सरकारने PMGKAY योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी वाढवला आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली असून आता २०२८ पर्यंत योजनेअंतर्गत लोकांना मोफत रेशन मिळत राहील.

मंत्रिमंडळाने PMGKAY योजनेला १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना काळात लॉकडाऊनमुळे त्रस्त गरीबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.

PMGKAY म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला गरिबांच्या सोयीसाठी प्रत्येक वेळी मुदतवाढ देण्यात आली. मोफत रेशन योजनेचा विस्तार करण्याच्या मोदी सरकारच्या या निर्णयाचा देशभरातील एकूण ८० कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) 5 किलो अनुदानित खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, प्रति लाभार्थी दरमहा पाच किलो अन्नधान्याचे मोफत वाटप जाते.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *