20 व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती
जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुशिक्षित बेरोजगार डी.एड-बी.एडधारकांची भरती होणार आहे. त्यांना दरमहा 15 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
सदरच्या निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व त्यापेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमधील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची नियुक्ती ही सेवानिवृत्त शिक्षक अथवा डीएड / बीएड अहर्ता धारण करणाऱ्या बेरोजगार शिक्षक यांच्यामधून नियुक्ती देण्यात येणार आहे .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 02 शिक्षक यापैकी एका पदावर डीएड / बीएड पात्रता धारण करणाऱ्या बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती ही सदर निर्णयांमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नियुक्ती दिली जाणार आहे .
सदर कंत्राटी तत्वावर बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती देताना करार पद्धतीने नियुक्ती दिली जाईल , तसेच कोणत्याही संवर्गामध्ये सेवा समावेशन तसेच सामावून घेण्याचे हक्क सदर उमेदवारास लागू राहणार नाहीत. सदर उमेदवारांची नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षाकरिता देण्यात येईल,तर नियुक्ती ही आवश्यकतेनुसार दरवर्षी नूतनीकरण करता येईल.
सदर कंत्राटी तत्वावर नियुक्त शिक्षकास दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाईल , यामध्ये इतर कोणत्याही भत्त्यांचा समावेश नसेल.तसेच सदर शिक्षकास शैक्षणिक वर्षांमध्ये 12 रजा अनुज्ञेय राहतील,तर त्या व्यतिरिक्त रजा ह्या विनावेतन केले जाईल.सदर नियुक्त शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे इतर प्रशासकीय अधिकार नसणार आहेत,सदर उमेदवारांनी त्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
सदर कंत्राटी शिक्षकांचे कामकाज समाधानकारक नसल्यास त्वरित सेवा समाप्त करण्यात येईल,तसेच ज्यावेळी सदर शाळेचे पटसंख्या ही 10 पेक्षा अधिक होईल,त्यावेळी सदर शाळेवर नियमित शिक्षक येईपर्यंत कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती कायम राहील .

