अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

१७ दिवसांपासून चिमुकल्यांच्या अंगणवाड्यांना बंद, अंगणवाडी मदतनीस, सेविकांचे बेमुदत कामबंद संप सुरूच…

Share this post

मानधनवाढ व सेवेत कायम करावे, अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. त्यांनी ३ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे १७ दिवसांपासून गावागावातील चिमुकल्यांच्या अंगणवाड्या बंद आहे.

प्रत्येक गावांमध्ये किमान एक ते दोन अंगणवाड्या आहेत. सकाळी काही तासांसाठीच या अंगणवाड्या सुरू असतात. चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि शाळा व शिक्षकांविषयीची भीती दूर व्हावी या हेतूने या अंगणवाड्या सुरू आहेत. मात्र, शासन दरबारी मागण्यांचे निवेदन देऊनही त्यावर सकारात्मक तोडगा न निघाल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या शाळांचे समीकरण बिघडले आहे.

शासन स्तरावरून मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी घेतली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *