पदवीधरांसाठी आनंदाची बातमी, IDBI बँकेत ५०० जागांसाठी भरती…
बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने नोकरीची उत्तम संधी आणली आहे. जर तुम्ही देखील पदवीधर असाल तर आजच या नोकरीसाठी अर्ज करा.
IDBI मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ५०० जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या पदासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर अतिंम मुदत ही २६ फेब्रुवारी असेल.
इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात.