देशभरात आज सर्वत्र संविधान दिन साजरा…
देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून संविधान दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या, आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत, आपण सगळेच एकत्रितपणे विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे,सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


