महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, ‘वंचित’ ची अखेर महाविकास आघाडीत एन्ट्री…
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागेल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीत समावेश झालाय. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिलीय.महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना यासंबंधी पत्र पाठवण्यात आले आहे.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.
भाजपाविरोधात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं म्हणत होते. परंतु महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांबरोबर वंचितचे असलेले राजकीय मतभेद पाहता हे गणित जुळून येणे कठीण होते. परंतु, आज (३० जानेवारी) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर केली आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एक्सवर पोस्ट करत आघाडीची माहिती दिली.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी घटकपक्ष असल्याचं अधिकृत पत्र द्यावं, अशी मागणी धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानुसार ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सह्यानिशी महाविकास आघाडीच्या पत्रावर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.
आदरणीय श्री.प्रकाश आंबेडकर जी,@Prksh_Ambedkar @VBAforIndia pic.twitter.com/prp036Cu2S
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 30, 2024
वंचीत बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 30, 2024
ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे 2 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील.
वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.@Prksh_Ambedkar… pic.twitter.com/BpkyWDvlt9