अपडेटशैक्षणिक

खोटे दावे करणाऱ्या कोचिंग संस्थांवरुद्ध होणार कारवाई…

Share this post

आमच्याकडे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण ‘ , ‘ कोचिंग क्लास मुळेच विद्यार्थ्यांना यश ‘ असे होर्डिंग्स चौकात, इमारतींवर जागोजागी दिसतात,  पण आता अशा भ्रामक जाहिराती करणाऱ्या कोचिंग संस्थांवर कारवाई होईल, असे चित्र स्थिती निर्माण झाली आहे. ग्राहक संरक्षण नियामक (CCPA) ने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वांवर 16 मार्चपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत.

CCPA ने कोचिंग संस्था, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी तपशीलवार सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे, असे अधिकृत CCPA प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत. कोचिंगमध्ये गुंतलेल्या कोणालाही ते लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन ग्राहक संरक्षण कायदा, 2019 नुसार केले जाईल आणि प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे भागधारकांना स्पष्टता आणतील आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करतील.

कोचिंग इन्स्टिट्यूटने कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा दर, निवड संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करणे टाळावे.

कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची कबुली न देता, विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे, असे भासवू नये.

कोचिंग संस्थांनी विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये की कोचिंग अत्यावश्यक आहे.

कोचिंग संस्थांनी अशा कोणत्याही गोष्टीत गुंतू नये, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होईल किंवा ग्राहकांची स्वायत्तता नष्ट होईल.

कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *