उत्तरप्रदेशमधल्या दीपोत्सवाची – गिनीज विक्रमामध्ये नोंद…
उत्तर प्रदेश मधील दीपोत्सव केवळ अयोध्या आणि उत्तर प्रदेशसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी एक अनोखा सोहळा ठरला आहे. पंतप्रधानांची ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना यातून साकार होते असं सांगत अयोध्येचं वैभव पुनःप्राप्त करणे हा दीपोत्सव आयोजित करण्याचा उद्देश असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश सरकारने राम की पौडीसह अयोध्येतील 51 घाटांवर काल दीपोत्सवानिमित्त 22 लाख 23 हजार दिवे प्रज्वलित करून सहाव्यांदा जागतिक गिनीज विक्रमाची नोंद केली आहे.