अपडेटराष्ट्रीय

उत्तरकाशी बोगद्यातील ४१ कामगारांची सुटका, बचावकार्य मोहीम यशस्वी…

Share this post

उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यातील कर्मचाऱ्यांच्या बचावमोहिमेला मोठं यश आलं आहे. सर्व ४१ कामगार बोगद्या बाहेर आले आहेत.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्याचं काम सुरु असताना भूस्खलन झाल्यानं १२ नोव्हेंबरपासून ४१ कामगार आत अडकले होते. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते.१७ व्या दिवशी ही बचावमोहीम यशस्वी ठरली आहे. अमेरिकन ऑगर मशिनच्या सहाय्यानं ६० मीटरच्या अंतराचं खोदकाम सुरु करण्यात आलं होतं. या कामागारांच्या सुटकेच्या मोहिममध्ये जिनेव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख अरनॉल्ड डिक्स यामध्ये सहभागी झाले. अरनॉल्ड डिक्स हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे आहेत.

अरनॉल्ड डिक्स हे या मोहिमेत २० नोव्हेंबरपासून सहभागी झाले होते. अरनॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन, जिनेव्हाचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्याकडे भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी आणि कायदा विषयाच्या पदव्या आहेत. त्यांनी विज्ञान आणि कायदा विषयाची पदवी मोन्साह विद्यापीठ मेलबर्न येथून मिळवली आहे.अरनॉल्ड डिक्स हे गेल्या ३० वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *