उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी एसएचआरईएसएचटीए निवासी शिक्षण योजना…
अनुसूचित जातींमधील 2,564 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2023- 24 साठी सीबीएसई/राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न 142 खासगी निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे लक्ष्यित क्षेत्रांमधील उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण योजना (एसएचआरईएसएचटीए) ही केंद्रीय क्षेत्रातील योजना राबवण्यात येते.
सरकारच्या विकासविषयक हस्तक्षेपांची पोहोच वाढवणे आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अनुदानित शिक्षण संस्था (बिगर सरकारी संघटनांतर्फे संचालित) तसेच निवासी उच्च माध्यमिक शाळांच्या प्रयत्नांनी अनुसूचित जातींचे आधिक्य असलेल्या भागशिक्षणाच्या अनुसूचित जातीच्या सामाजिक आर्थिक उत्थानाला व सामाजिक विकासाला आवश्यक वातावरण निर्माण करणे हा एसएचआरईएसएचटीए योजनेचा उद्देश आहे.
अनुसूचित जातींमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि समग्र विकास घडवून आणण्याच्या आणि त्यायोगे त्यांच्या भविष्यातील संधी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये सुलभतेने प्रवेश मिळवून देण्यासाठी या योजनेमध्ये अधिक सुधारणा करण्यात आल्या.
या योजनेचे साध्य परिणाम दाखवणाऱ्या निर्देशांकांच्या अधिक उत्तम नोंदींसाठी योजनेच्या प्रगतीचे संकलन आणि प्रसारण यासाठी वास्तव वेळेचा वापर करणारी माहिती व्यवस्थापन यंत्रणा (एमआयएस) देखील सुरु करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत, अनुसूचित जातींमधील एकूण 2,564 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र 2023-24 साठी सीबीएसई/राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न 142 खासगी निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला असून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटी 30.55 कोटी रुपयांची रक्कम या विभागाने अदा केली आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.