आयुष्यमान कार्ड – पाच लाखापर्यंत मोफत उपचार, जाणून घ्या योजनेची अधिक माहिती…
आयुष्मान कार्ड असेल तर सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो.
आयुष्यमान कार्ड योजना ही एक सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात.
कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप ट्रान्सप्लांट, मोतीबिंदू आदी आजारांवर या योजनेद्वारे उपचार करता येणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कच्च्या घरात राहणारे, भूमिहीन, अनुसूचित जाती किंवा जमातीचे, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर आणि दारिद्र्य रेषेखालील लोक याचा लाभ घेऊ शकतात. या लोकांना योजनेसाठी अर्ज करता येतो.
हे कार्ड संपूर्ण भारतात वापरले जाऊ शकते.आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.या योजनेंतर्गत समाविष्ट कुटुंबे कोणत्याही आगाऊ पैसे किंवा कोणत्याही कागदपत्राशिवाय उपचार घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. https://pmjay.gov.in/
आयुष्मान भारत योजनेच्या कॉल सेंटरला 14555 किंवा 1800-111-565 वर कॉल करू शकता.