आता घरबसल्या डाउनलोड करा Voter Slip…
नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप करताना दिसत आहेत. परंतु सर्व पातळीवर यंत्रणा काम करत असतानाही काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहचलीच नसल्याची तक्रार येत आहे. अशावेळी तुम्ही ऑनलाईन किंवा एसएमएसच्या माध्यमातून वोटर स्लिप मिळवू शकता. ही वोटर स्लीप नेमकी कशी मिळवायची याबद्दल जाणून घ्या.
सर्वात अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन वॉटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड भरून ॲप लॉगिन करा. पुढे नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवर रजिस्टर करा. यानंतर EPIC क्रमांक सर्च केल्यावर वोटर स्लिप दाखवली जाईल. ती डाऊनलोड करून घ्या.
तुम्ही तुमच्या मोबाईलवरून SMS च्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती ECI स्पेस आणि कार्ड क्रमांक लिहून 1950 वर मेसेज पाठवा. यानंतर चौदा सेकंदामध्ये तुम्हाला मतदान केंद्राची माहिती मिळेल.
तुमच्याकडे वोटर स्लिप नसेल परंतु मतदान कार्ड असेल तरीदेखील तुम्ही मतदान करू शकता.
तसेच वोटर स्लिप मिळवण्यासाठी मतदान केंद्राला भेट द्या. महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने 12 ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदान करण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट वाहन परवाना कशा महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.