अपडेटमहाराष्ट्र

आईवरुन मुलांची जात ठरवता येणार नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट…

Share this post

आईवरुन मुलांची जात ठरवता येणार नाही, असं राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली.

एखादा व्यक्ती कुणबी असेल तर त्याच्या पत्नीच्या नात्यातल्या नातेवाइकांना तसं कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. शेवटच्या माणसाची कुणबी नोंद बघेपर्यंत ही कार्यवाही चालूच राहणार, असल्याचं महाजन यांनी सांगितलं. मंत्री उदय सामंत आणि संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, आरक्षण जाहीर करण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत पुढे ढकलण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. काल जालना इथं झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी हीच भूमिका मांडली.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *