अपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्रशैक्षणिक

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन पोर्टल,अर्जदारांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही.

Share this post

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्याकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यप्रणाली नव्याने विकसित करण्यात आली असून, या प्रक्रियेमुळे अर्जदार, पालक आणि अन्य संबंधित व्यक्तींना समिती कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

बार्टीच्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन कार्यप्रणाली पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे अर्जदारांना अर्जासंबंधीच्या कामासाठी समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या नवीन ऑनलाइन कार्यप्रणालीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक समितीच्या कार्यालयात मोठ्या अक्षरांतील माहितीफलक तात्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *