अपडेटक्राईमजालनाशैक्षणिक

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा, शाळेतल्याच विद्यार्थ्यांनी केला गळा आवळून खून

Share this post

जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळाच्या मैदानात वाद झाला. अजय पवार या विद्यार्थ्याचा तिसरीतल्या विद्यार्थ्यां बरोबर वाद झाला होता. अजय हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याची बहीण गौरी ही याच शाळेत शिकते. वाद झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी शाळेच्या आदिवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहात गेले. संध्याकाळचे जेवण ही अजय ने याच वसतिगृहात केले. त्यानंतर तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. तो पर्यंत सर्व स्थिती सुरळीत होती.

सकाळ झाल्यानंतर अजय झोपेतून उठत नव्हता. त्याला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. त्याचा श्वास बंद झाला होता. त्यामुळे ते कर्मचारी घाबरले. त्यांनी वसतिगृह प्रशासनाला ही माहिती कळवली. लागलीच ही बाब पोलिसांना ही सांगण्यात आली. पोलिसही वसतिगृहात दाखल झाले. अजयला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषीत केलं.

अजयच्या गळ्यावर खूणा दिसत होत्या. त्यामुले मुलाचा खून झाला असावा असा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त केला. पोलिसांनाही त्यात तथ्य दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत अधिक तपास केला. चौकशी केल्यानंतर मैदानात वाद झाल्याची बाब पोलिसांना समजली. त्यांनी त्या संबधीत दोन विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. हे दोन्ही विद्यार्थी तिसरीत शिकतात. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार सांगितला. अजय रात्री झोपेत असताना आपण त्याचा गळा आवळल्याचं या दोन्ही विद्यार्थ्यांनी सांगितलं. 

ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, खेळताना झालेल्या किरकोळ वादातून या दोन अल्पवयीन मुलांनी दोरीने बालवीरचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. 8 आणि 13 वर्षे वय असलेल्या या दोन अल्पवयीन बालकांना भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *