अपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्र

होमगार्ड पदासाठी नोंदणी सुरु, दहावी पास करू शकता अर्ज, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Share this post

दहावी पास असणाऱ्या युवकांसाठी राज्यात सध्या जिल्हानिहाय होमगार्ड भरती सुरू झाली आहे. तरुणांसाठी ही नोकरीची मोठी संधी असणार आहे. राज्यात होमगार्डसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ही 14 ते 16 ऑगस्टपर्यंत आहे. जिल्हानिहाय अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेगळी आहे.

या भरतीमध्ये होमगार्ड म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रतिदिन 895 रुपये भत्ता राज्यसरकारकडून दिला जातो.होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. म्हणजेच अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती केली जाते.

शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.इच्छुक उमेदवाराचे वय साधारण 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असावे.उंची- पुरुषांकरता 162 सेमी महिलांकरता 150 सेमी छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान 76 सेमी

रहीवासी पुरावा, शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्यासाठी 10 वी बोर्ड प्रमाणपत्रशाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र.

नियूक्ती झालेल्या उमेदवाराला बंदोबस्त दरम्यान नियुक्त केल्यास प्रतिदिन 895 रुपये भत्ता देण्यात येतो. यामध्ये बंदोबस्त काळात 570 रुपये कर्तव्य भत्ता, 100 रुपये उपहार भत्ता तर प्रशिक्षणकाळात 35 रु खिसाभत्ता व 100रुपये भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये मिळतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *