अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 60 हजार रुपये.

Share this post

गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. आर्थिक अडचणी शिवाय त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी; यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चांगली मदत होते.

ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी योजना राबवली जात आहे. या माध्यमातून भाड्याने खोली घेण्यासाठी आणि जेवणासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना’ ओबीसी कल्याण विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दरवर्षाला 60 हजार रुपये दिले जातात.

या योजनेअंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षाला भोजन भत्ता 32 हजार रुपये, निवासी भत्ता 20 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 8000 रुपये असे 60 हजार रुपये दिले जाणार आहेत.

जर धनगर समाजातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल तर त्यांना भोजन भत्ता म्हणून 23 हजार रुपये, निवासी भत्ता 10 हजार रुपये आणि निर्वाह भत्ता 5000 रुपये असे एकूण 38 हजार रुपये मिळणार आहेत.

या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील 600 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे 21,000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वीमध्ये 60% गुण आहेत त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही रक्कम दिली जाते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *