५ हजार ३४७ जागांसाठी महावितरणमध्ये मोठी भरती
महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायक पदांसह विविध एकूण 5 हजार 347 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये पदांनुसार पात्र आणि इच्छूक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यास पुन्हा एकदा २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजूनही अर्ज भरला नसेल तर आत्ताच अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in/ वर जाऊन अर्ज भरता येईल.
अर्ज भरण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेली मुदत संपली असून उमेदवारांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करुन महावितरणने २० जुनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली आहे. महावितरण कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरात विद्युत सहायक, कनिष्ठ सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदांच्या एकूण 5 हजार 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत एकुण 5 हजार 347 जागा आहेत. वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे देण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.