अपडेटक्राईममुंबई

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या…

Share this post

मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

मॉरीसभाई याच्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावून ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोन्हा हा कार्यालयाबाहेर हातात रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आला.

त्यानंतर तो मोठ्या आवाजात ‘आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेगा, असं जोरात ओरडला. दरम्यान, 13 फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मनालीत वाढदिवस साजरा करण्याचं नियोजनही अभिषेक यांनी केलं होतं. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

कार्यालयात गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अभिषेक घोसाळकरला ऑफिसबाहेर फरफट नेल्याचं एका साक्षीदारानं सांगितलं. त्यानंतर जेव्हा अभिषेक समर्थक आणि लोक जमायला लागले, तेव्हा तो जमाव बघून घाबरून मॉरिस भाईनं त्या पिस्तुलानं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली, असं बोललं जातंय.

गोळीबारात वापरलेलं शस्त्र हे अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मॉरिसला शस्त्र परवाना नव्हता, असं सांगितलं जातंय. मात्र, मॉरिस भाईकडं हे शस्त्र कुठून आणि कसं मिळालं, याचा तपास पोलीस करणार आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *