अपडेटशैक्षणिक

‘ एनईपी ’ राबविण्यासाठी देशातील १५ लाख शिक्षकांना प्रशिक्षण…

Share this post

देशभरातील १५ लाख शिक्षकांना ‘मालवीय मिशन ट्रेनिंग प्रोग्राम’ अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी देशभरात १११ पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांचे हे प्रशिक्षण ऑनलाईन मोडद्वारे मोफतही असणार आहे.

इतकेच नव्हे, तर हे प्रशिक्षण घेणारे शिक्षक, प्राध्यापक हे पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) अध्यक्ष जगदीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र, राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू झाली खरी, मात्र राज्यातील अनेक विद्यापीठात निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत, त्यामुळे एनईपी राबविण्यासाठी संबंधित विद्यापीठांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

एनईपी राबविण्यासाठी हे आव्हान ठरणार असल्याचेही जगदीश कुमार यांनी नुकत्याच पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत म्हटले आहे. युजीसीकडून संबंधित महाविद्यालयांना शक्य तितक्या लवकर पदभरती करण्यास सुचित करण्यात आले असून चांगला स्टाफ आणि त्यांना प्रशिक्षणे दिल्यानंतर परिणामकारकरित्या ‘एनईपी’ राबविता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *