अपडेटक्राईम

हाई झुमका वाली पोर फेम अभिनेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा…

Share this post

हाई झुमका वाली पोर फेम गाण्याचा अभिनेता विनोद कुमावत अडचणीत आलाय. ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केलीय. पीडितेने ही तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलीय.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलाय. गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केलाय.

युट्यूब चॅनलद्वारे गीते प्रसारित करणाऱ्या कुमावतने पीडितेसोबत ओळख वाढवली. या ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून मागील पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

पीडितेसोबत शूटिंगदरम्यान कुमावत याची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमीष दाखवून पीडितेवर अत्याचार केला.दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत (रा. म्हाडा कॉलनी सातपूर, नाशिक) याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *