अपडेटइतरराष्ट्रीय

ट्रकचालकांनी का पुकारलाय संप, चला जाणून घेऊ…

Share this post

केंद्र सरकराने आणलेल्या एका कायद्याविरोधात हा संप पुकारला आहे. संपामुळे शहरांत पेट्रोल डिझेल पोहोचत नाहिये. इतकंच काय भाजीपाला आणि फळंही बाजारात पोहोचले नाहिये. ट्रक ड्रायव्हर्सनी का पुकारलाय संप, काय आहेत त्यांच्या मागण्या, जाणून घेऊया.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. यांनी संसदेत एक विधेयक मांडलं, बहुमताने ते पासही झालं. पण त्याचे पडसाद देशाच्या रस्त्यावर उमटले. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता कायद्यात दुरुस्ती आणलीये. सरकारने हिट अँड रन हा कायदा आणखी कडक केलाय.

पूर्वी हिट अँड रन प्रकरणात कलम २७९, ३०४ ए, ३३८ अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे. आरोपीवर हलगर्जीपणे गाडी चालवणे, हलगर्जीपणामुळे मृत्यू आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचा आरोप व्हायचा. या प्रकरणी आरोपीला जास्तीत जास्त दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. काही विशेष प्रकरणात कलम ३०२ म्हणजेच खुनाचे कलमही जोडले जायचे.

आता केंद्र सरकारने हा कायदा आणखी कडक केलाय. आता हिट अँड रन प्रकरणात ७ लाख रुपयांचा दंड आणि १० वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केलीये. त्यामुळे ट्रकचालक संतापलेत.

संप करणारे चालक म्हणालेत की परदेशी कायद्याच्या धर्तीवर हा नवीन कायदा आणलाय. पण ज्या प्रमाणे परदेशात रस्ते असतात तसे रस्ते भारतात नाही. सरकारने रस्ते चांगले करावेत आणि परिवहन व्यवस्था चांगली करावी अशी मागणी चालकांनी केलीये. हिट अँड रनमध्ये सात लाखांच्या दडांची तरतूद आहे, एखादा ड्रायव्हर एवढी मोठी रक्कम कुठून आणणार असा सवाल आंदोलक ड्रायव्हर्संनी विचारलाय. या जाचक अटींमुळे हा संप पुकारला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *