जुन्या पेन्शन बाबत मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत निवेदन मांडल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन संदर्भातील निवेदन अधिवेशनात मांडल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर कर्मचारी संघटनाची बैठक झाली. त्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जुन्या पेन्शन योजनेसह १८ मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे सरकारी कामकाज ठप्प झाले होते. रुग्णव्यवस्थेवरही ताण वाढला होता.
आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा निवेदन मांडले. सरकार सकारात्मक असून योजनेसाठी स्थापित करण्यात आलेल्या समितीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.

