10वी व ITI उत्तीर्णांसाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी…
भारतीय नौदलाने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी apprenticeship.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2024 पर्यंत आहे. निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक नेव्हल डॉकयार्ड, विशाखापट्टणम येथे केली जाईल.
10वीत 50 टक्के गुण मिळवून व ITI (NCVT/SCVT) पदवी उत्तीर्ण उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 14 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी अधिसूचना बघावी किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अर्जासाठी ही कागदपत्रे –
एसएससी किंवा मॅट्रिकचे प्रमाणपत्र
आयटीआय प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
एनसीसी प्रमाणपत्र
क्रीडा प्रमाणपत्र
या सर्व पदांसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या सर्व अर्जदारांना प्रवेशपत्र दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना रु.7700 ते रु.8050 पर्यंतचे स्टायपेंड दिले जाईल.

