अपडेटआरोग्य

कोरोनासोबतच इतरही अनेक गंभीर आजार असतील त्यांनी व्यायाम सावधगिरीने करावा : आयसीएमआरच्या संशोधनाचा अहवाल…

Share this post

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता त्यांनी अधिक कष्टाचे कोणतेही काम करणे टाळले पाहिजे. अशा लोकांनी एक किंवा दोन वर्षांपर्यंत व्यायाम, धावणे, जॉगिंग आदी करू नये. गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्याबद्दल मांडवियांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आयसीएमआरने यावर एक संशोधन केले आहे.

आयसीएमआरने १४ हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर संशोधन केले होते. त्यानुसार, ज्यांना कोरोनाचा संसर्ग एकापेक्षा जास्त वेळा झाला व रुग्णालयात दाखल व्हावे लागले अशा लोकांपैकी ६.५% लोकांचा मृत्यू झाला.

जे कोरोनातून सावरले, त्यांच्या रिकव्हरीचा दर वेगवान राहिला. ते आता सहजपणे धावू शकत आहेत. तथापि, जे कोरोनासह आधीपासूनच इतर आजारांनी ग्रस्त होते त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांना कोरोना झाला तेव्हा त्यांच्यावर याचा गंभीर परिणाम झाला. अशा रुग्णांनी कष्टाची कामे करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

ज्यामध्ये हृदयाचे ठोके जलद होतात अशी कामे त्यांनी करू नये. हे स्पष्ट झाले आहे की, ज्यांना फक्त कोरोना होता व रिकव्हर झाले त्यांनी नियमित व्यायाम करावा. ज्यांना इतर गंभीर आजार आहेत त्यांनीच कठीण व्यायाम करण्याचे टाळले पाहिजे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *