WhatsApp कॉलवरून समोरच्या व्यक्तीला कळणार नाही तुमचं लोकेशन…
WhatsApp नं आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये वाढ करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलसाठी Protect IP Address फिचर सादर केलं आहे.
WhatsApp नं कॉल करताना आणि रिसिव्ह करताना युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये वाढ करण्यासाठी ‘Protect IP address in calls’ फिचर आणलं आहे. तुम्ही कॉल करताना आयपी अॅड्रेस लपवण्याचा हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर व्हॉट्सअॅप तुमचा कॉल थेट समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट न करता कंपनीच्या सर्व्हरच्या माध्यमातून पाठवेल, त्यामुळे तुमचा आयपी अॅड्रेस दिसणार नाही.
कॉल्समध्ये आयपी अॅड्रेस लपवण्यासाठी व्हॉट्सअॅप पिअर-टू-पिअर कनेक्शन ऐवजी कंपनीच्या सर्व्हरचा वापर करेल, त्यामुळे आयपी अॅड्रेस मास्क होईल आणि तुमची प्रायव्हसी अबाधित राहील. असे जरी झाले तरी कॉल एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड राहतील असं कंपनीनं सांगितली आहे.
मेटा इंजिनियर्सनी नवीन फिचरची माहिती कंपनीच्या ब्लॉगमधून दिली आहे. ह्या ब्लॉगमधून ‘प्रोटेक्ट आयपी अॅड्रेस इन कॉल्स’ ही सेटिंग कशाप्रकारे दोन युजर्समध्ये कॉल कनेक्ट होण्याची पद्धत कशी बदलते हे सांगण्यात आलं आहे. इतर अनेक अॅप्स जे कॉलिंग फिचर देतात त्यांच्या प्रमाणे व्हॉट्सअॅपवरही पिअर-टू-पिअर कनेक्टिव्हिटी मिळते ज्यामुळे दोन्ही युजर्स एकमेकांचे आयपी अॅड्रेस पाहू शकता.
या फीचर चा वापर कसा कराल…
१)WhatsApp लेटेस्ट व्हर्जन अॅप स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. २)ओपन व्हॉट्सअॅप सेटिंग मेन्यू आणि प्रायव्हसीवर टॅप करा.खाली स्क्रोल करा आणि अॅडव्हान्सवर टॅप करा. ३)प्रोटेक्ट आयपी अॅड्रेस इन कॉल्स वर टॅप करा आणि नवीन प्रायव्हसी फिचर ऑन करा.

