दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या तिकीटात वाढ – एसटी महामंडळाकडून भाडेवाढ जाहीर
राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर तिकिटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.
ज्या एसटी प्रवाशांनी आधीच तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची वाढीव फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.
महसूल वाढीच्या दृष्टीने तिकिटाच्या दरात भाडेवाढ करण्यात आली आहे अशी माहिती आहे.


