अपडेटतंत्रज्ञानमहाराष्ट्रराष्ट्रीय

1 डिसेंबरपासून भारतात मोबाईलच सिम कार्ड घेण्याचे नियम आणखी कडक…

Share this post

1 डिसेंबरपासून सिमकार्डशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. या नियमांनुसार, सिम खरेदी करतांना ग्राहकांसोबतच विक्रेत्यांचीही व्हेरिफिकेशन होणार आहे.

देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना यामुळे चाप बसणार आहे.

नवीन सिमकार्ड खरेदी करताना ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक तपशील द्यावा लागणार आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीने गु्न्हा केला तर त्या सिमकार्डशी लिंक केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्या व्यक्तिचा सहजपणे शोध घेतला जावू शकतो.सायबर गुन्हेगारीत सर्वाधिक गुन्हे हे बोगस नावाने घेतल्या सिमकार्डवर केले जातात. पण नवीन नियम लागू झाल्यानंतर इतर कोणाच्या नावावर सिम कार्ड घेणं शक्य होणार नाही.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *