मुंबई विद्यापीठात वसतीगृहातील 40 विद्यार्थीनींना विषबाधा…
मुंबई विद्यापीठातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मुलींच्या नूतन वसतिगृहात दूषित पाणी पुरवठ्यामुळे 40 विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थिनींना उलटी, जुलाब, पोटदुखी, चक्कर येणे आदी त्रास होत आहेत.
या घटनेनंतर युवा सेना आणि माजी सिनेट सदस्यांनी वसतिगृहात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना तिथे अनेक त्रुटी आढळल्या. या त्रुटींची माहिती त्यांनी कुलगुरूंना दिली. तसेच येथील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार आहे. येथील पाचपैकी फक्त तीनच कुलर वापरात आहेत. उर्वरित दोन अजूनही कार्यान्वित नाही.
या वसतिगृहातील विद्यार्थिनी गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या अनेक समस्यांना तोंड देत होत्या. आता त्यांना विषबाधा झाल्याचे समजत आहे. वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॉटर कुलरमुळे ही परिस्थीती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीवरून वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची योग्य ती स्वच्छता राखण्यात येत नव्हती. परिणीमी विद्यार्थिनींना पोटाचे विकार झाले आहेत. वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर जवळपास एक वर्ष टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता.
दरम्यान, या संदर्भात खुलासा करत विद्यापीठाणे म्हटले आहे की, “वासतिगृहात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून ते पाणी दूषित नाही. विद्यार्थिनींना उन्हामुळे त्रास होत असावा, असा अंदाज विद्यापीठाकडून वर्तवण्यात आला आहे.
