अपडेटक्रीडा

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात सलग दुसरा विजय…

Share this post

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंच्या फलंदाजांना सेट होऊ दिले नाही.टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी २० षटकात फक्त १९१ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी टीम इंडिया जिंकली. टीम इंडियाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.

तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २० षटकात २३६ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल,ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने धुव्वाधार खेळी खेळली. तिघांनी अर्धशतक केले.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २० षटकात ९ गडी गमावून फक्त १९१ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने तब्बल ४४ धावांनी सामना जिंकला.

टीम इंडियासाठी रवि बिष्णोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले . भारताने मालिकेत सलग दुसरा सामना जिंकला आहे. यामुळे टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *