एक हजार रुपयाची लाच घेतांना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात…
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालच्या मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी हे एक हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे. लाच देण्यास नकार दिल्यामुळे हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव करणा-या मुख्याध्यापकाने नंतर लाच घेतली व एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या बाबत अधिक माहिती घेतली असता , तक्रारदार हे आदर्श हायस्कूल कुसुंबा येथे उपशिक्षिका या पदावर आहेत. शाळेत झालेल्या विद्यार्थी संमेलनाचे निमित्त करून झालेल्या खर्चाच्या नावाने मुख्याध्यापक यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदर खर्चाची तरतूद ही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फी सोबत स्वतंत्रपणे केली असल्याने तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार दिला असता तक्रारदार यांना आलोसे यांनी हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव केला होता.
तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचांसमक्ष लाचेची रक्कम 1,000/- रुपये मागणी करून आलोसे यांनी रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
