अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ चाळीसगाव अध्यक्षपदी दिपक कुंभार यांची नियुक्ती…
अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या चाळीसगांव शाखेच्या तालुका अध्यक्ष पदी दिपक सुधाकर कुंभार (शेलवडकर) यांची निवड करण्यात आली.
दिपक कुंभार (शेलवडकर) हे प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे ता.चाळीसगांव जि.जळगांव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
अखिल भारतीय प्रजापती कुंभकार संघाचे प्रदेश अध्यक्ष गजानन कोमलकर व उपाध्यक्ष गंगाधर जोर्वेकर यांच्याहस्ते दिपक कुंभार यांना नियुक्ती पत्र देवून नियुक्ती करण्यात आली.
