बारावीनंतर मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार,642 कोर्सेसचा समावेश
बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक अतिशय मोठी बातमी आहे. आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून होणार आहे.
मुलींना उच्च शिक्षण घेता यावे आणि मुलींनी त्यांच्या करिअरमध्ये पुढे जावे; यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचे शुल्क शासनामार्फत भरले जाणार आहे.
मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा त्याचप्रमाणे उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून मुलींचा विवाह करून देणे हा प्रकार थांबावा. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
जवळपास 20 लाख मुलींना याचा फायदा होणार आहे.राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास 20 लाख मुलींना 642 कोर्सेस पूर्णपणे मोफत देण्याची सुविधा सरकार करणार आहे. या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते. परंतु आता पूर्णपणे ही फी सरकारच भरणार आहे. यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार असल्याची माहिती आहे.