पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर…
इंग्लंडच्या संघाने यावेळी प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावांचा डोंगर उभारला. इंग्लडंला याववेळी ८२ धावांची दमदार सलामी मिळाली. कारण सलामीवीर डेव्हिड मलानने यावेळी दमदार ५९ धावांची खेळी साकारली. मलान बाद झाल्यावर जो रूट आणि बेन स्टोक्स यांच्यामध्ये चांगलीच भागीदारी जमल्याचे पाहायला मिळाले. रुटने यावेळी ६० धावांची दमदार खेळी साकारली. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत ८४ धावांची खेळी साकारली आणि त्याचे शतक १६ धावांनी हुकले. रुट आणि स्टोक्स या दोघांनाही शाहीद आफ्रिदीने बाद केले. पण या दोघांनी आपले काम चोख बजावले त्यामुळे इंग्लंडच्या संघाला ३३७ धावा करता आल्या.
या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले, त्यामुळे त्यांची २ बाद १० अशी स्थिती झाली होती. त्यानंतर बाबर आझमने काही काळ चांगली फलंदाजी केली, पण त्याला ३८ धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या आगा सलमानने ५१ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मात्र मिळवून देता आला नाही. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानला विजय काही मिळवता आला नाही. हा सामना जर पाकिस्तानने ६.४ षटकांमध्ये जिंकला असता तर त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता आले असते, पण ते शक्य नव्हते. पाकिस्तान या सामन्यात त्यानंतर विजय मिळवून शेवट तरी गोड करेल, असे वाटले होते. पण वर्ल्ड कपच्या आपल्या अखेरच्या सामन्यात त्यांना विजय मिळवता आला नाही. पाकिस्तानवर या सामन्यात इंग्लंडने ९३ धावांनी मोठा विजय साकारला.