YouTube चे नवीन फीचर्स…
आतापर्यंत यूट्यूबवर फक्त 10 सेकंदांसाठी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करता येत होते, परंतु आता तो 20 सेकंदांपर्यंत फास्ट फॉरवर्ड करता येईल. तसेच YouTube सेटिंग्जमध्ये जाऊन तुमच्या इच्छेनुसार फास्ट फॉरवर्ड वेळेत बदल करू शकता.
YouTube ने आता व्हॉल्यूम स्टेबल फीचर आणले आहे, ज्यामध्ये व्हिडिओ प्ले करताना आवाजाचा त्रास होणार नाही.
YouTube ने आता व्हिडिओ पाहताना स्क्रीन लॉक फीचर आणले आहे. म्हणजे, स्क्रीनला चुकून हात लावला, तरी देखील तुमचा व्हिडिओ बघण्याचा आनंद खराब होणार नाही.
यूट्यूबचे नवीन फीचर्स –
- लॉक स्क्रीन
- सब्सक्राइब बटन अपडेट
- फास्ट फारवर्ड
- लायब्ररी आणि अकाउंट टॅबला मर्ज करुन नवीन टॅब
- व्हॉइस सर्च कमांड
- मोठा प्रीव्ह्यू थम्बनेस्ल
- स्मार्ट टीव्हीसाठी नवीन व्हर्टिकल मेन्यू
- व्हिडिओ लिंक कॉपी करण्याचा पर्याय.