UPI Transaction चे लिमिट वाढवलं – RBI चा निर्णय…
जर का तुम्ही Gpay, Amazon Pay, PayTM, Phonepe यांसारख्या ॲप्सचा वापर करून पैश्यांचे व्यवहार करत असाल तर आत्ताची ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे.
देशात सर्वोच्च मानली जाणारी बँक म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया, देशात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींची जबाबदारी रिझर्व बँकवर सोपवली गेली आहे. त्यामुळे अनेक आर्थिक घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी RBI वेळोवेळी अनेक कायदे आणि योजना अंमलात आणत असते. आता देखील बँकने एक मोठी घोषणा केली आहे. देशभरात चाललेल्या UPI चा वापर लक्षात घेता RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPIद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
UPI चा वाढता वापर आणि लोकांच्या गरजा लक्षात घेता RBIचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे पेमेंटची मर्यादा (UPI Transaction Limit) एक लाख रुपयांवरून थेट पाच लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. मात्र लक्षात घ्या की हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्येच करता येतील, इतर कोणत्याही ठिकाणी एवढी मोठी रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही.


