अपडेटक्रीडा

T20 भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवला थरारक विजय…

Share this post

नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत तीन बाद २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने ५० चेंडूत ११० धावा केल्या. जोशच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे वीस षटकांत २०९ धावा करण्याचे आव्हान ठेवले.

भारतीय खेळाडूंनी फलंदाजी करत – ऋतुराज गायकवाड शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीत झाला. यशस्वी जयस्वाल ८ चेंडूत २१ धावा करून मॅथ्यू शॉर्टच्या चेंडूवर स्टीव्हन स्मिथकडून झेलबाद (२ षटकार, २ चौकार) ईशान किशन ३९ चेंडूत ५८ धावा करून तन्वीर संघाच्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टकडून झेलबाद (५ षटकार, २ चौकार) तिलक वर्मा १० चेंडूत १२ धावा करून तन्वीर संघाच्या चेंडूवर मार्कस स्टॉइनिसकडून झेलबाद (२ चौकार) सूर्यकुमार यादव ४२ चेंडूत ८० धावा करून जेसन बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर आरोन हार्डीकडून झेलबाद (४ षटकार, ९ चौकार) अक्षर पटेल ६ चेंडूत २ धावा करून शॉन अॅबॉटच्या चेंडूवर त्याच्याकडूनच झेलबादरवी बिश्नोई एका चेंडूत शून्य धावा करून धावचीतअर्शदीप सिंग शून्य चेंडूत शून्य धावा करून धावचीतरिंकू सिंग १४ चेंडूत नाबाद २२ धावा (४ चौकार)मुकेश कुमार नाबाद शून्य चेंडूत शून्य धावा.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर दोन विकेट्स राखत थरारक विजय मिळवला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *