PM विश्वकर्मा योजना – सरकार देणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…
या योजनेत सुतार, बोट बनवणारे, लोहार, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभारकाम करणारे, शिल्पकार, गवंडी, फिश नेट मेकर, टूल किट बनवणारे, दगड तोडणारे, मोची, खेळणी बनवणारे (पारंपारिक), नाई, माला बनवणारे, धोबी, शिंपी यांना फायदा होईल.
वरील व्यवसाय करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकारकडून लाभ मिळणार आहेत. या योजनेद्वारे देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना आर्थिक मदत मिळेल जेणेकरून ते स्वत:चा व्यवसाय स्थापन करून तो पुढे नेतील.
या योजनेंतर्गत, दोन हप्त्यांमध्ये सवलतीच्या दराने 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर फक्त 5 टक्के व्याज आकारले जाते. यामध्ये तुम्हाला पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये मिळतात.
यासाठी आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक पासबुक, वैध मोबाईल नंबर.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ला भेट द्यावी लागेल.
होमपेजवर तुम्हाला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेच्या पर्यायावर क्लिक करुन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
