पवनी न.प.केंद्राची चतुर्थ शिक्षण परिषद संपन्न.
पवनी : नगर परिषद लाल बहाद्दूर शास्त्री प्राथमिक शाळा पवनी चतुर्थ शिक्षण परिषद संपन्न.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन तसेच पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे गट समन्वयक दिपाली बोरीकर,अरविंद लांजेवार विषय साधनव्यक्ती पंचायत समिती पवनी, केंद्रप्रमुख राजु तुमसरे, स्वयंसेवक अनिता जांभुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अंबादास पंधरे (सहाय्यक शिक्षक) विकास प्राथमिक शाळा पवनी यांनी आदर्श परिपाठ सादर करून शिक्षण परिषदेला सुरूवात केली. स्नेहल मोटघरे (सहाय्यक शिक्षिका) विकास प्राथमिक शाळा पवनी यांनी आदर्श पाठाचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. दिपाली बोरीकर गट समन्वयक पंचायत समिती पवनी यांनी,सिस परिक्षा, संकलित मूल्यमापन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मुल्यमापनाच्या विविध पद्धती व तंत्र आणि प्रश्न निर्मिती याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख राजु तुमसरे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन विद्यार्थी लाभाच्या विविध योजना याविषयी उपस्थित सर्वांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.

शिक्षण परिषद आयोजक विकास प्राथमिक शाळा, गणेश वार्ड पवनी यांच्याकडे असल्याने शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापिका मिथिला खंडारे यांनी उत्तम प्रकारे केले.विषय साधनव्यक्ती अरविंद लांजेवार यांनी पुढील शिक्षण परिषद निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्यामध्ये सक्सेना प्राथमिक शाळा पवनी यांची आयोजक म्हणून निवड झाली.
अशाप्रकारे आनंददायी वातावरणात शिक्षण परिषद संपन्न झाली.शेवटी वंदे मातरम् ने आजच्या शिक्षण परिषदेची सांगता झाली.सदर शिक्षण परिषदेला न.प.केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.