अपडेटआर्थिकऑटोमहाराष्ट्रराष्ट्रीय

आता 3000 रुपयांत वर्षभर प्रवास, गडकरींची Fastag बाबत घोषणा

Share this post

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag बाबत सर्वात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आता ३००० रुपयांचा वार्षिक पास मिळणार आहे. म्हणजेच काय तर तुम्ही ३००० रुपयांच्या या पासच्या जोरावर वर्षभर प्रवासाचा लाभ घेऊ शकता.

याबाबत नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हंटल कि,आम्ही १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणारा ३,००० रुपये किमतीचा FASTag-आधारित वार्षिक पास सादर करत आहोत. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० ट्रिपपर्यंत वैध असेल. हा पास (FASTag Annual Pass) केवळ कार, जीप आणि व्हॅन सारख्या गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी बनवण्यात आले आहे असेही गडकरींनी सांगितलं. ३००० रुपयांच्या या वार्षिक पासमुळे प्रवाशांना देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करता येईल. हा पास ऍक्टिव्ह करण्यासाठी राजमार्ग यात्रा अॅपवर तसेच NHAI आणि MORTH च्या अधिकृत वेबसाइटवर एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

सरकारच्या या धोरणामुळे ६० किमीच्या आत असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या चिंता दूर होतील. ही नवीन सिस्टीम प्रवाशांना संपूर्ण वर्षभरासाठी एकदाच पेमेंट करून टोल भरण्याची प्रक्रिया सोप्पी करेल. प्रवासादरम्यान, वारंवार टोल पेमेंट करण्याची आवश्यकता दूर होईल तसेच वार्षिक पासमुळे गर्दी कमी होईल. महत्वाची बाब म्हणजे एकदाच वर्षभराचा पास (FASTag Annual Pass) काढल्यामुळे टोल प्लाझावरील वाद कमी होतील आणि महामार्ग नेटवर्कवरून खाजगी वाहनांची जलद हालचाल सुनिश्चित होईल अशी अपेक्षा सरकारला आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *