अपडेटशैक्षणिक

NBEMS फेलोशिप परीक्षेसाठी नोंदणी सुरु…

Share this post

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board Of Examinations In Medical Sciences-NBEMS) कडून फेलोशिप प्रवेश परीक्षा (FET) २०२४ साठी नोंदणी सुरू झाली आहे. NBE FET साठी नोंदणी करू इच्छिणारे उमेदवार natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी २०२४ आहे.

फेलोशिप प्रवेश परीक्षा ३ मार्च रोजी घेतली जाईल. परीक्षेचा निकाल ३ एप्रिल पर्यंत जाहीर केला जाईल. परीक्षेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा प्रश्नांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट पोर्टल लिंक https://exam.natboard.edu.in/communication.php?page=main ला भेट देऊ शकतात, असे NBE कडून सांगण्यात आले आहे.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पदव्युत्तर वैद्यकीय पदवी पूर्ण केलेले आणि MD, MS, DM, MCh, DNB, DRNB किंवा समतुल्य मान्यताप्राप्त पात्रतेचे तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी पात्र मानले जातील. फेलोशिप कोर्समध्ये प्रशिक्षणासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *