महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ शाखा नागपूर तर्फे कला शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळव्दारा आयोजित ऋतुरंग-२०२४ राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
राज्यस्तरीय ऋतुरंग-२०२४ चित्रकला स्पर्धेत जिल्हा शाखा नागपूरच्या वतीने जिल्ह्यातील 25,730 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुबंई व्दारा आयोजित महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धा २०२४ स्पर्धेत सुद्धा सहभाग नोंदविला.या दोन्ही स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा नागपूर च्या वतीने सेवानिवृत्त कला शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ सुरेश भट सभागृह रेशिमबाग नागपूर येथे संपन्न झाला.
या समारंभात डॉ.आयुश्री आशिष देशमुख डायरेक्टर इंडो पब्लिक स्कूल व अध्यक्ष माऊली फाऊंडेशन, नरेंद्र बारई राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, डॉ.विश्वनाथ साबळे अधिष्ठाता शासकीय कला अभिकल्प महाविद्यालय, दिगांबर बेंडाले सर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपुर, पी.आर.पाटील राज्य सल्लागार,महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, किशोर सोनटक्के विभागिय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, आशिष पोहणे सहकार्यवाह, किरण पराते, राजेश गवरे अध्यक्ष मनपा शिक्षक संघ नागपूर, सदानंद बोरकर सचिव भारतीय शिक्षण संस्था नवरगाव, राज्य स्पर्धा प्रमुख दिपक गायकवाड, कमलताई घोडमारे राज्य महिला आघाडी सदस्या, नागपुर जिल्हा अध्यक्ष शेखर वानस्कर उपस्थितीत होते.
ऋतुरंग चित्रकला स्पर्धेत विनायकराव देशमुख हायस्कूल शांतीनगर नागपुर शाळेला कलाप्रेमी पुरस्कार प्राप्त झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दुर्गेश आपतुरकर,सानिया चोधरीतन्मय पाटील, दुसरा क्रमांक खुशी शाहू,हर्शिता पुंडलिके, तृतीय क्रमांक तृप्ती मेश्राम नताशा भनारकर आणि बालचित्रकला स्पर्धेत सानवी मानकर ला राज्यस्तरीय पुरस्कार प्रमाणपत्र आणि मोमेंटो देण्यात आले. शिवम शेंडे यास जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला.
