राज्यातील शाळांना वर्षभरात किती सुट्ट्या ? सुट्यांची यादी जाहीर
विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी जारी करण्यात आली आहे. ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या १० दिवस आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्या असणार आहेत.
१५ जूनपासूनच शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु झाल्यानंतर आता शाळांच्या वर्षभरातील सुट्ट्यांची यादीदेखील जाहीर झाली आहे. राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश आहे. रविवारच्या सुट्ट्यांचादेखील यात समावेश आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) असणार आहे. उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्ट्या असणार आहे. (२ मे ते १३ जून २०२६) पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत.
- जुलै : आषाढी एकदशी, मोहरम, नागपंचमी
- ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
- सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
- ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी
- नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
- डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
- जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
- फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
- एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी