शैक्षणिकउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

HDFC बँकेकडून विद्यार्थ्यांना मिळणार 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती…

Share this post

समाजातील गुणवंत आणि गरजू मुलांना मदत करण्यासाठी HDFC बँक समोर आली आहे. HDFC बँकतर्फे वर्ष 2023- 24 साठीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 31 डिसेंबर अशी अर्ज भरण्याची अंतिम दिनांक आहे. दिलेल्या मुदतीच्या आत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान बँकने केले आहे.

HDCF बँक परिवर्तन योजना (HDFC Parivartan Scholarship 2023) असे या योजनेचे नाव असून इयत्ता 1 ली ते पदव्युतर शिक्षण घेणारे विद्यार्थी योजनेचा भाग बनू शकतात.

योजनेतर्गत मुलांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी रक्कम मदत म्हणून दिली जाईल. जसे कि इयत्ता 1 ते 6 वी पर्यंत 15 हजार रुपये, इयत्ता 7 ते 12 वी 18 हजार रुपये, ITI/Polytechnic/Diplomaसाठी 18 हजार रुपये, पदवीचे शिक्षण जर का जनरल असेल तर 30 हजार रुपये तर प्रोफेशनलसाठी 25 ते 50 हजार आणि पदव्युत्तर जनरल शिक्षणासाठी 35 हजार तर प्रोफेशनल कोर्ससाठी 75 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.

अर्ज करणारा विद्यार्थी हा इयत्ता पहिली ते बारावी, डिप्लोमा, ITI तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्याला मागच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 55 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त असणे अनिवार्य आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न 2 लाख किंवा 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे, इतर योजनांप्रमाणेच इथे देखील विद्यार्थी भारताचा नागरिक असणे अत्यावश्यक आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *