अपडेटतंत्रज्ञान

Google Play Store वरून कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स हटवले जाणार

Share this post

Google Play Store वरून कमी दर्जाचे आणि नॉन-फंक्शनल ॲप्स हटवले जाणार आहेत. 31 ऑगस्ट 2024 पासून या योजनेवर कामं केलं जाणार आहे. स्पॅम आणि मिनिमम फंग्शनॅलिटी पॉलिसी अपडेट करण्यासाठी Google ने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स अशा अ‍ॅप्सचा समावेश असणार आहे.युजर्सना केवळ Google Play Store वर हायर स्टँडर्डचे अ‍ॅप्स मिळावेत यासाठी हे नवीन अपडेट लाँच केलं जाणार आहे.

Google Play Store वर काही धोकादायक अॅप्स असतात, ज्यामुळे युजर्सचं नुकसान होऊन त्यांचा डेटा लिक होऊ शकतो. युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील कंपनीचे हे नवीन अपडेट महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही सुध्दा Google Play Store वरून अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करता पण त्यातील काही अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतात. कंपनीने 2023 मध्ये असे धोकादायक अ‍ॅप्स Google Play Store वरून हटवले होते. या अ‍ॅप्समध्ये AA Kredit, Amor Cash, Guayaba Cash, Easy Credit, Cash wow, CrediBus, Flash Loan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Rápido Crédito, Finupp Lending, 4S Cash, True Naira, Easy Cash यांचा समावेश होता. हे अॅप्स 12 Million लोकांनी डाऊनलोड केलं होतं.

यानंतर काही दिवसांतच कंपनीने Google Play Store वरून तब्बल 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले होते. या अ‍ॅप्समध्ये मालवेअर किंवा व्हायरस होता. हे अ‍ॅप्स एकूण 2.5 मिलियन वेळा डाउनलोड करण्यात आलं होतं. या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. फोनची स्क्रीन बंद असतानाही हे अ‍ॅप्स जाहिराती दाखवत होते. त्यामुळे कंपनीने Google Play Store वरून हे अ‍ॅप्स हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनी Google Play Store वरून काही अ‍ॅप्स हटवण्याच्या तयारीत आहे.

Google ने आपल्या अपडेट दरम्यान सांगितलं की, ॲप्सनी त्यांच्या युजर्सना स्टेबल, रिस्पॉन्सिव आणि एंगेजिंज अनुभव प्रदान केला पाहिजे. पण काही अ‍ॅप्स त्यांच्या युजर्सना अशा प्रकारच्या सोयी देण्यासाठी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्ले स्टोअरची सुरक्षा आणि प्लॅटफॉर्मची गुणवत्ता सुधारण्यासाठी कंपनीने अशा ॲप्सना काढून टाकण्याच निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये, कंपनीने धोरणाचे पालन न करणाऱ्या 2.28 दशलक्ष ॲप्सना प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होण्यापासून थांबवलं होतं. याव्यतिरिक्त, कंपनीने जवळपास 200,000 ॲप सबमिशन नाकारले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *