मुलींनाही वडिलांच्या पेन्शनचा लाभ मिळेल, पात्र वारसांमध्ये नाव बंधनकारक
पेन्शनधारक कल्याण विभागाने सर्व पेन्शनधारकांसाठी नवीन नियम जाहीर केला असून यापुढे पेन्शनसाठी पात्र कुटुंबातील सदस्यांच्या यादीतून मुलीचे नाव वगळता येणार नाही. पेन्शनधारक कल्याण विभागाने नवीन नियमांतर्गत मुलींना आर्थिक सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अविवाहित, विवाहित आणि विधवा मुलींनाही निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकेल. याशिवाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन (EOP) अंतर्गत मिळणारे सर्व सेवानिवृत्ती लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियम बदलला सरकारी कर्मचारी अनेकदा आपल्या पेन्शन नॉमिनीमद्ये मुलीचे नाव टाकत नाहीत. याबाबत निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने आदेश जारी करून म्हटले आहे की, पेन्शनच्या स्वरूपात मुलगीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य मानली जाते त्यामुळे, कुटुंबातील सदस्यांच्या यादीत मुलीचेही नाव असले पाहिजे. केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, २०२१ नुसार कुटुंबात सावत्र आणि दत्तक मुलींव्यतिरिक्त अविवाहित, विवाहित आणि विधवा मुली असतील तर त्या सर्वांची नावे पेन्शन लाभार्थींमध्ये समाविष्ट केली जातील.